नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता. नंदूरबार शाळेत “जागतिक एड्स दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डी.एस.पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी शाळेचे उपशिक्षक विजय पवार यांनी दिग्दर्शित केलेले “वचन पाळूया एड्स टाळूया” हे पथनाट्य शिक्षकांद्वारे सादर करण्यात आले यात कलाशिक्षक आनंदराव पवार, दीपक वळवी, रामानंद बागले, संजय बोरसे,हरूणखा शिकलीगर,श्रीमती अरुंधती शिंदे,श्रीमती नेहा शर्मा आदींनी भाग घेतला या पथनाट्यातून एच.आय.व्ही एड्स कसा होतो? त्याची लक्षणे कोणती?तो होऊ नये त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? एच.आय.व्ही झालेल्या रुग्णाशी कशी वर्तणूक करावी? या सर्व विषयांवर विनोदातून प्रबोधन करण्यात आले. पथनाट्य चा शेवट एड्स विषाणूची प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार विजय पवार यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता *”वंदे मातरम्* या गीताने करण्यात आली.








