Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाढत्या तंत्रज्ञान वापरासोबत माहिती सुरक्षेवर लक्ष देणे आवश्यक: जागतिक संगणक सुरक्षा वेबिनार मधील मान्यवरांचे मत

team by team
December 2, 2021
in क्राईम
0
वाढत्या तंत्रज्ञान वापरासोबत माहिती सुरक्षेवर लक्ष देणे आवश्यक:  जागतिक संगणक सुरक्षा वेबिनार मधील मान्यवरांचे मत

नंदूरबार l प्रतिनिधी

माहिती  तंत्रज्ञानावर अवलंबित्व स्विकारलेल्या जगासमोर डाटा अर्थात माहितीची सुरक्षा हे मोठे आव्हान आहे, त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबर अमूल्य माहितीची सुरक्षाही महत्वाची आहे, याबाबतीतचा निष्काळजीपणा मोठ्या संकटांना निमंत्रण देणारा ठरु शकतो असे मत जागतिक संगणक सुरक्षा दिवसानिमित्त आयोजित वेबिनार मध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केले.

`इन्फोटेक फोर मी` संस्थेतर्फे एका संवाद वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यात संगणक, लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यासक  दिपक वडनेरे संचालक, इंदू कॉम्प्युटर, समाधान पाटील  कबचौउमवितील संगणक तज्ज्ञ, योगेश निकम मोबाईल तज्ज्ञ आणि डॉ. सोमनाथ वडनेरे, कबचौउमवि तील सोशल मीडिया शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.

संगणक, लॅपटॉप,मोबाईल सुरक्षेइतकीच माहितीची सुरक्षा अत्यंत महत्वपूर्ण असून संपूर्ण जग या साधनाद्वारे माहिती आणि संवाद तंत्रज्ञानामुळे एकत्र आले आहे. अशा वेळेस वैयक्तिक माहिती, प्रशासकीय माहिती, देश सुरक्षेची माहिती, कार्यालयीन दस्तऐवज आदिंच्या गोपनियतेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असणे गरजेचे आहे. यातील थोडीशी निष्काळजी मोठ्या संकटास निमंत्रण देणारी ठरते.तेव्हा तंत्रज्ञानाच्या भौतिक सुरक्षे बरोबरच माहितीच्या सुरक्षेस तितकेच प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले. या वेबिनार मध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट, डाटाबेस आदिंच्या सुरक्षेविषयी सहभागीच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तालुक्यात २३ मेंढ्या दगावल्या,अमळथे येथे तीन घरांचे नुकसान

Next Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती

Next Post
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add