नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने नंदूरबार तालुक्यातील मांजरे शिवारात मेंढपाळ यांच्या १५ मेंढ्या दगावल्या, तर तालुक्यातील अमळथे येथील तीन कच्चे घरे जमीनदोस्त झाली आहेत.तर खर्दे खुर्द व तलवाडे येथे प्रत्येकी ४ मेंढ्या दगावल्या.

नंदूरबार जिल्हात कालपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने वातावरणात गारठा वाढला. नंदूरबार तालुक्यातील मांजरे गावाबाहेरील टेकडी परिसरात मेंढपाळ यांनी आपला वाडा तेथे उतरवला होता.दरम्यान गारठ्याने १५ मेंढ्या मेल्या, तसेच तालुक्यातील अमळथे येथील तीन कच्चे घरे जमीनदोस्त झाली.तसेच तळवाड खुर्द येथे चार मेंढ्या आणि खर्दे खुर्द येथे चार मेंढ्या थंडीमुळे दगावल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. दरम्यान या पावसामुळे पिकांवर रोग राई पसरण्याची शक्यता आहे.








