नंदुरबार | प्रतिनिधी
गेल्या पावणे दोन वर्षांपासुन बंद असलेल्या शहरी व ग्रामीण भागात शाळांची आज घंटा वाजली असुन नंदुरबार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील १ हजार ५९८ शाळा उघडल्या.तर २५५ शाळा बंद होत्या.पहिल्याच दिवशी ग्रामिण भागात ६० टक्के तर शहरी भागात ४४.६९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती होती.
राज्य शासनाच्या आदेशानुसार एकूण १ हजार ७३६ पहिली ते चौथी शाळा आजपासून सुरू झाल्या नंदुरबार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील १ हजार ५९८ शाळा उघडल्या.तर २५५ शाळा बंद होत्या.पहिल्याच दिवशी ५८.६४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती होती. ग्रामीण भागातील १ हजार ४६ शाळांमध्ये २ लाख ३०३ पैकी १ लाख २० हजार १८१ विद्यार्थी अशी एकुन ६० टक्के उपस्थीती होती. तर शहरी भागातील ११२ शाळांमध्ये १९ हजार ५१५ पैकी ८ हजार ७२१ विद्यार्थी अशी एकुन ४४.६९ टक्के उपस्थीती होती.
आज चिमुकल्यांची शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थी शाळेकडे मार्गक्रमण करताना दिसून आलेत. शाळा प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. शहरी भागात सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या तर ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा अकरा वाजता सुरू झाल्या. शाळेत येणार्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रशासनाच्या वतीने थर्मल गनणे तपासणी करून हात सॅनिटायझर करून वर्गात सोशल डिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांना अध्यापनाला सुरुवात केली होती.
आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीती कमी असली तरी गेल्या पावणे दांन वर्षानंतर प्राथमिक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. गेल्या दोन वर्षापासून घरात ऑनलाईन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षक व वर्ग मित्रांना भेटण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये ही मोठा उत्साह दिसून आला आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.








