Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्तर निश्चिती करून अध्ययन अनुभव द्या: वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांचे प्रतिपादन

team by team
December 1, 2021
in शैक्षणिक
0
स्तर निश्चिती करून अध्ययन अनुभव द्या:  वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांचे प्रतिपादन

नंदुरबार l प्रतिनिधी
तब्बल दिड वर्षांच्या दीर्घ अवकाशाचानंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळांमध्ये येत असून, या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून त्यांच्यासाठी सुयोग्य अध्ययन अनुभव निवडावे लागतील, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी केले.


शासनाने ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरू करण्याची अधिसूचना जारी केली. त्या अनुषंगाने आज दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. काही ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला, तर काही ठिकाणी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी व विषय सहायक देवेंद्र बोरसे यांनी या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच शिक्षकांचे अभिनंदन केले.यावेळी शासनाच्या परिपत्रकानुसार घ्यावयाची काळजी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दिर्घ अवकाशानंतर विद्यार्थी शाळांमध्ये येत असून, या विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी सर्वप्रथम त्या त्या वर्गातील अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने अध्ययन स्तर निश्चिती करावी लागेल, असे सांगतानाच विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तेतील किमान अध्ययन क्षमता प्राप्त व्हाव्यात, यासाठी शिक्षकांनी अध्ययन अनुभवांची निवड करावी, शाळेतील डिजिटल साधनांचा वापर करावा. भाषा, गणित व इंग्रजी विषय पेटीतील साहित्याचा अध्ययन अनुभव देण्यासाठी वापर करावा, असे प्रतिपादन वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी केले. विषय सहायक देवेंद्र बोरसे यांनीही यावेळी शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक संजय नामदेव पाटील, सहशिक्षक गौतम ईशी, श्रीमती अनुपमा वळवी, डोंगरसिंग वसावे, देवेंद्र वळवी, श्रीमती मंदाकिनी वळवी, कु. जया वसावे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

शनिमांडळ येथे शनिवारी भरणार शनिभक्तांचा मेळा, भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Next Post

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ राज्य निवडणूक आयुक्त

Next Post

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ राज्य निवडणूक आयुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add