नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील आरटीओ कार्यालयासमोर दुचाकीस्वाराने धडक दिल्याने पादचाऱ्यास दुखापत झाली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नाशिक येथील रमेश भिमराव सोनवणे हे नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालयासमोरुन पायी जात होते. यावेळी पंकज पांडूरंग तांबोळी रा.रनाळे ता.नंदुरबारयाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एम.एच.१५ जीसी ५८५८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात पायी जाणाऱ्या रमेश सोनवणे यांना मागून धडक दिल्याने त्यांना दुखापत झाली. याबाबत रमेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पंकज तांबोळी याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.वसावे करीत आहेत.








