नंदुरबार l प्रतिनिधी
प्रकाशा ते धुरखेडा रस्त्यावरील वळणावर भरधाव चारचाकी वाहन चारीत उलटल्याने उलटल्याने चालक ठार झाल्याची घटना घडली.याप्रकरणी मयत चालकाविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, भावेश प्रल्हादभाई पटेल (वय ४३) रा.वढवाना ता.डोबई जि.बडोदा हे त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनाने (क्र.जी.जे.०६ जेएफ ३२१९) प्रकाशा ते धुरखेडा रस्त्याने जात होते. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविल्याने प्रकाशा गावाजवळील वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याला बाजूला असलेल्या खड्ड्यातील चारीत उलटल्याने अपघात घडला. या अपघातात भावेश प्रल्हादभाई पटेल ठार झाले तर वाहनाचेही नुकसान झाले. याबाबत वैशालीबेन निलेशभाई पटेल यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात मयत भावेश पटेल याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास पोहेकॉ.रमण वळवी करीत आहेत.








