तळोदा l प्रतिनिधी
आमलाड ता.तळोदा शिवारात असलेल्या गोविंद पुरुषोत्तम पाटील यांच्या शेतात दि.३० मंगळवार रोजी सकाळी ऊसतोड मजुरांना बिबट्या मादीचे
साधारण 15-20 दिवसांचे तीन बछडे दिसून आल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारात तळोदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन गोविंद पुरुषोत्तम पाटील यांच्या सर्व्हे नंबर 15 मधील शेतात ऊस तोडणी चालू असताना सोमवार रोजी संध्याकाळी अचानक उसाच्या पाचट मधून एक बिबट्या मादीचे बछडा मजुरांच्या दिशेने आले. सदरील बछडा बिबट्या मादीला आर्त हाक मारीत असल्याचे मजुरांकडून सांगण्यात आले. संध्याकाळच्या वेळी बिबट्या मादी शेतातच फिरकत असल्याचे पाहून शेतकरी व शेतमजूर भयभीत होऊन तेथून पळ काढला. नंतर दुसऱ्या दिवशी दि.३० मंगळवार रोजी सकाळी ऊसतोड मजुरांना बिबट्या मादीचे तीन बछडे दिसून आले. त्यातील एक पाचटच्या बाहेर आल्याने शेतकरी गोविंद पाटील यांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकार निलेश रोडे यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिली. त्यामुळे निलेश रोडे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन उपाययोजना केल्या. परिसरातील ऊस तोड कामगारांना ऊस तोडणी बंद ठेवण्याच्या सूचना देत, खबरदारी घेण्याचे सांगितले. सदरील बछडे हे साधारण 15-20 दिवसांचे अगदी लहान असल्याने रोडे यांनी सांगितले. त्यामुळे तळोदा वनविभागाचे कर्मचारी शेतातच तळ ठोकून आहेत. रात्रीच्या वेळी बिबट्या मादी बछड्यांना सुखरुप सुरक्षित स्थळी नेणार असल्याची वनविभागाने अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी वनरक्षक लक्ष्मी पावरा, विरसिंग पावरा, राज्या पावरा, गिरीधर पावरा शेतमजूर उपस्थित होते.








