शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे तरूणाईच्या इच्छाशक्तीच्या जोरावर शतकीय परंपरा असलेला ललीतोत्सव तब्बल चौदा वर्षानंतर साजरा करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, ललीतोत्सव सुरू करण्यास तिनशे वर्षाची परंपरा असल्याचे वृद्धांनी सांगितले.शतकापुर्वी पासून असलेले वरीष्ठ सहभागी कलाकार वृद्धापकाळाने कमी होत गेल्याने तब्बल चौदा वर्षे ललीतोत्सव बंद होता.मात्र तरूणाईच्या इच्छाशक्तीच्या जोरावर यावर्षी साजरा करण्यात आला.ललीतोत्सव साजरा करण्यामागे गावात शांतता नांदावी,रात्रभर मशाल जळावी जेणेकरून गावावर येणारे अरिष्ट ठळेल,नैसर्गिक आपत्ती,भुकंप,जलप्रलय असे संकट येणार नाही अशी श्रद्धा आहे.संध्याकाळी सात वाजेपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत नाट्यप्रदर्शन सुरू असते.यात चोपदार, विदूषक,गणपती,गजासूर,सरस्वती, गोपाळ, ब्राम्हण, नवनाथ,जंगम,फकीर,मच्छावतार,शंकासूर,बैरागी,हिरण्यकश्यप राजा दरबार,नरसिंह अवतार, गोसावी, नारद, शिवशंकर, जोशी,श्रावणबाळ,दक्ष प्रजापती दरबार,गुरगुडी, नंदी,एकतारी भजन पद,भराडा,गोंधळी,गोपीचंद पद,भांड,गुजराथी दरबार,शेठ शेठाणी,जती,वैदू,माऊली,भगत,श्रीराम दरबार,रावण दरबार या पात्रांसह पहाटे पाच वाजता पुर्ण गावात आई भवानी माता फेरी काढण्यात आली.विविध वेषभुषा,आकर्षक मुखवटे घालून पात्र सादर केली.गावात भवानी माता भाविकांनी ठिकठिकाणी आरती,पुजा करण्यात आली. या ललीतोत्सवात अंबालाल पाटील,जयंत पाटील,स्वप्निल चौधरी,लाला पाटील,भुषण पाटील,अनुराग चौधरी,पुष्कर चौधरी,ऊमेश पाटील,रामेश्वर चौधरी,दिपक पाटील,कुणाल पाटील,सचिन चौधरी,विवेक पाटील,निलेश पाटील,मयुर पाटील,द्वारकेश पाटील,संकेत पाटील,मोहीत पाटील,रोहीत पाटील,प्रजल पाटील, किरण पाटील,भावेश पाटील यासह इतर तरूणांनी सहभाग घेवून भुमिका केल्या.सुत्रधार म्हणून भरत ओंकार पाटील यांनी तर भजन, रासगायन,भक्तीगीत यासाठी भगवान पाटील,तुकाराम पाटील,माधव पाटील,संजय चौधरी,रविंद्र चौधरी,उध्दव पाटील,सुरेश पाटील,वासुदेव पाटील,राजेंद्र पाटील,मधुकर पाटील यांसह इतरांनी साथ दिली तर किशोर सोमजी पाटील,शशिकांत गोविंद पाटील, संजय तुकाराम पाटील,कैलास पाटील,जगदीश मक्कन पाटील,अशोक चौधरी, विकास दशरथ पाटील,रविंद्र काशिनाथ चौधरी यांनी सहकार्य केले.तब्बल चौदा वर्षानंतर साजरा झालेल्या ललीतोत्सव पाहण्यासाठी पुसनद,कोळदा येथील ग्रामस्थांसह गावातील महिलावर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.ललीतोत्सव सुरू झाल्याने जेष्ठांसह वृद्ध मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे तर तरूणाईचे कौतूक केले.








