तळोदा ! प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तळवे रस्त्यावर बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दुचाकींचा समोरा-समोर धडकल्याने झालेल्या अपघातात तुळाजा येथील 3 व तळोदा येथील १असे ४ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.या अपघातात दोन जण जखमी झाले होते. उपचारा दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.
तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर सलसाडी फाट्याजवळ दि.७ जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली समोरा समोर धडकल्याने ही घटना घडली. मुलाचे आधार अपडेटसाठी तळोदा येथे आलेले तुळाजा येथील कुटुंब आपले कामे आटोपून पुन्हा तुळाजाकडे जात असताना हा अपघात घडला.
दरम्यान या अपघातात दारासिंग छगन जाभोरे 48, मदन दिवळ्या नाईक 50, अमित मगन नाईक 10 हे जागीच ठार झाले.
तर बोरद येथून शेतीचा मोजनीचे कामे आटूपुन दुचाकीवर आई व पत्नी सोबत तळोदा येथे परतत असणाऱ्या उमेश शांतीलाल चव्हाण व सोबत असलेली त्याची आई सुंनंदा चव्हाण यांना गंभीर मार लागला असून, पूजा उमेश चव्हाण हिस मुक्का मार लागला.
अपघात दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेले उमेश व त्यांच्या आईला डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातळीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आणले त्यांच्यावर डॉ.विजय पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉ.आफसिंग पाडवी वैद्यकीय अधिकारी, रमेश कलाल, तुषार चौधरी, आदींनी उपचार केले मात्र रक्तश्राव अधिक झाल्याने व डोक्याला जबर मार लागल्याने उमेश शांतीलाल चव्हाण रा.तळोदा वय 30 यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ.आफसिंग पाडवी यांनी सांगितले. तर सुनंदा शांतीलाल चव्हाण ह्या महिलेस पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा देखील रात्री 8 वाजेचा सुमारास मयात झाल्याची घटना घडली. सदर घटनेनंतर शहरात एकच चर्चा सुरू असून अपघातानंतर सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे.
अपघात घडल्यानंतर पोलिसांना खबर मिळताच पो नी पंडित सोनवणे, पो.ना अजय पवार, पो.हे पिंटू अहिरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
चार महिन्या पूर्वीच उमेश याचा विवाह झाला होता.आपल्या काकाकडे बोरद येथून आई,पत्नी सह मोटार सायकल ने तळोदा येथे येत होता.तो नाशिक येथे खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. या अपघातात त्याचा मृत्यु झाला.आईच्शचा सोबत अपघात झाला असला तरी तिला एवढा मार लागलेला नव्हता असे प्रत्यक्ष दर्शनीच्या सांगण्यावरून कळले मात्र उमेश गेल्याचे तिला कळताच उमेशची आईनेही प्राण त्याग केला.