नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.पुजा मराठे तर नंदुरबार शहर महिला सचिवपदी शमिम खान यांची काँग्रेस सेवादलाच्या महिला जिल्हाध्यक्षा टी.आर.खान यांनी नियुक्ती केली आहे.

नंदुरबार येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेस सेवा दलातील नवनियुक्त महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भा.ई.नगराळे व नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यात काँग्रेस सेवा दलाच्या नंदुरबार जिल्हा महिला उपाध्यक्षपदी पुजा मराठे तर नंदुरबार शहर महिला सचिवपदी शमिम खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितराव पवार, राजेंद्र पाटील, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, काँग्रेस सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष रऊफ शहा, महिला जिल्हाध्यक्षा टी.आर.खान, काँग्रेस सेवादलाचे नंदुरबार शहराध्यक्ष हाजी युनूस कुरेशी, माजी नगरसेवक ईकबाल खाटीक, प्रविण शेलार, फारुख शेख आदी उपस्थित होते.








