येथील पंचायत समितीच्या परिसरातील संविधान स्तंभ जवळ रोटरी क्लब नंदनगरी व रोटरॅक्ट क्लब नंदनगरीच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद पोलीस जवांनाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अक्कलकुवा तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री.सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.पाटील, प्राथमिक वेतन पथकाचे दीपक धनगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बोहरी समाज संचलन पथकाचे प्रमुख फक्रुद्दीन जलगोनवाला, मुर्तुजा बोहरा, अब्बास बोहरा व जुजेर बोहरा यांच्या पथकाने ड्रमवाद्यसहित सलामी दिली. प्रस्तावना रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी मांडली. कार्यक्रमास क्लबचे सदस्य सुशिल गवळी, विजय बडगुजर, रोटरॅक्टचे अध्यक्ष सज्जाद सय्यद, सचिव पुष्कर सुर्यवंशी, ट्रेजरर अनिकेत अग्रवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिनेश साळुंखे यांनी मानले.