नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यातील लक्कडकोट गावात काल दि.२९ रोजी सायंकाळी अज्ञात इसमाकडून गोळीबार करण्यात आला. यात एक युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे.माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास . एका वाहनातून काळे जॅकेट व टोपी घातलेले दोन जण लक्कडकोटला आले . चिकन सेंटरवर बसलेल्या प्रवीण गावित यास पार्सल आहे का ? अशी विचारणा केली व त्याच्या दिशेने गोळीबार केला . त्यात प्रवीण गावित नावाचा युवक जखमी झाला आहे. प्रवीणच्या दिशेने दोन राउंड फायर करण्यात आले होते. दोन्ही राउंड मीस फायर झाले असले तरी एक गोळी त्याच्या हाताला चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. हा गोळीबार अवैध व्यवसायाच्या भानगडीतुन झाल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता. रात्रीतून नाकाबंदी करत आरोपीला शोधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. मात्र संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले.अद्यापही आरोपी हाती लागलेले नाही.








