Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकार्‍याच्या मध्यस्थीने तहसिल कार्यालयाचा विजपुरवठा सुरळीत,एम.एस.सि.बी.कार्यालयाचे सील काढले

team by team
November 29, 2021
in राज्य
0
थकबाकीवरुन महावितरण-तहसिलचा एकमेंकांना शॉक तहसिलचा वीज पुरवठा खंडीत केल्याने तहसिलदारांनी महावितरणचे कार्यालय केले सील, वाद पोहचला जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
नंदुरबार | प्रतिनिधी
थकबाकीवरुन काल महावितरण आणि तहसिल कार्यालयात चांगलीच जुंपली होती.वीज बिल थकीत असल्याने महावितरणने तहसिल  कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केला तर तहसिलचे कामकाज ठप्प असल्याने महावितरणकडे महसूलची अकृषक थकबाकी असल्याने तहसिलदारांनी तात्काळ कारवाई करत चक्क महावितरणचे कार्यालयालाच सील करत प्रतिशॉक दिला.दरम्यान हा वाद जिल्हाधिकार्‍यांपर्यंत पोहचला जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. त्यानंतर तहसिल कार्यालयाचा पुरवठा सुरळीत केला. उशिरापर्यंत विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयाचे सील काढण्यात आलेे.     महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी धडक मोहीम चालवली आहे. थकबाकीदार व वीज चोरांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.महावितरणकडून वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकी असल्याचे सर्वसामान्यांचे थेट वीज पुरवठा खंडीत करत शॉक दिला जात आहे.दरम्यान नंदुरबार तहसिल कार्यालयाकडे महावितरणचे सुमारे दीड लाख रुपये वीज बिल थकले होते. यामुळे महावितरणच्या शहर उपविभाग अतिरीक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयाचा वीज बिलाची थकीत रक्कम त्वरित भरण्याचे सांगितले होते. परंतु ट्रेझरीमधून बिलाची रक्कम हस्तांतरित होण्याला दोन दिवसाचा अवकाश असल्यामुळे वीज बिल भरले गेले नाही.त्यातच सध्या तहसिल कार्यालयात विविध महत्वाची कामे सुरू असल्याने दोन दिवसांनी भरणा करणार असल्याचे तहसिलदारांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितले.मात्र महावितरणने तहसिल कार्यालयाला शॉक देत चक्क वीज पुरवठा खंडीत केला.त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले.यामुळे तहसिलदारांनी प्रतिशॉक देत महावितरण कंपनीच्या सबस्टेशन आणि कार्यालयांकडे थकीत असलेल्या सुमारे तीन लाख ४२ हजार रुपयांचा अकृषक  भरणा का केला नाही अशी विचारणा करीत थेट नंदुरबार शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला सील ठोकले. या कारवाईमुळे वीज वितरणच्या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. संतप्त कार्यकारी अभियंता पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी आणि कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वीज वितरणचे काम बंद करत पोलिस ठाणे गाठले.दुसर्‍या बाजूला तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी वीज कंपनीच्या सर्व कार्यालयाची थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवण्याचा इशारा दिला.दोघा विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलीसांत गेल्यावर तेथे वरिष्ठांच्या मध्यस्थीने समझोता घडविला जात होता. अभियंता मनीषा कोठारी यांनी प्रोसिजर चालू असल्याचे सांगत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कोषागारातून वीजबिल भरण्याची रक्कम अदा करण्याची तजवीज करण्यात आली आहे.५० हजार रुपये प्राप्त झाले असून उर्वरित रक्कम दोन दिवसात प्राप्त झाल्यावर भरणा करण्यात येणार असल्याचे सांगितले.दरम्यान काल याबाबत वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना कळविली. दरम्यान महसूल विभागाने नंदुरबार तालुक्यातील आष्टे सबस्टेशनलाही सील केले. दरम्यान नंदुरबार शहरातील एकतानगर सबस्टेशनला सील करण्यासाठी जात असतांना त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांचा फोन आल्याने महसूल विभागाचे कर्मचारी माघारी फिरले. त्यानंतर जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी मध्यस्थी करत नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागू नये, यासाठी महावितरण कंपनीला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. तर तहसिलदारांना विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील सील उघडण्याचे आदेश दिले.त्यानंतर सायंकाळी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तहसिल कार्यालयाचा पुरवठा सुरळीत केला. उशिरापर्यंत विद्युत वितरण कंपनीचे सील काढण्यात आलेे. उद्या दि. ३० नोव्हेंबर रोजी पुर्वत काम कामकाज सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती दिवसनिमित्त युवा सेनेतर्फे रक्तदान शिबिर

Next Post

चिनोदा येथे मराठा समाजातील आदर्श विवाह, विधवा भावजाईला दिला सौभाग्याचा आधार

Next Post
चिनोदा येथे मराठा समाजातील आदर्श विवाह, विधवा भावजाईला दिला सौभाग्याचा आधार

चिनोदा येथे मराठा समाजातील आदर्श विवाह, विधवा भावजाईला दिला सौभाग्याचा आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add