नंदूरबार l प्रतिनिधी
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त युवा सेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 51 शिवसैनिकांनी रक्तदान केले.
हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिवस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज सोमवार दि. 29 नोव्हेंबर रोजी युवा सेनेतर्फे मारुती व्यायाम शाळेच्या परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी 51 शिवसैनिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिर शिबिराला सुरुवात झाली. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, माजी नगरसेवक मनोज चव्हाण, तालुकाधिकारी समाधान पाटील, उपतालुकाप्रमुख सागर साळुंखे, प्रफुल पाटील, पंडित माळी, युवती सेनेचा मालती वळवी, दिनेश भोपे, अर्जुन राजपूत,सचिन गाबणे, भूपेंद्र ठाकूर, दादू मराठे, गोविंदा चौधरी उपस्थित होते. रक्तदान शिबिराला जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक आकाश जैन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ खलील काझी, मनीष पवार, पुष्पा जनसंपर्क अधिकारी प्रकाश भोई, मदतनीस गोरख भिल, भूषण जैन यांनी सहकार्य केले.








