नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी कमलेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी कमलेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली, सदर नियुक्ती पत्र है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य समन्वयक सुहास उभे यांच्या उपस्थितीत देण्यात आले, नंदुरबार जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका, भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा या दृष्टीने जास्तीत जास्त ओबीसी समाजातील घटक है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडण्याचे काम करण्याचे त्यांना आदेशित करण्यात आले , सदर नियुक्ती पत्र देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास चौधरी, बापू महाजन, प्रदेश सरचिटणीस एन.डी.पाटील, गिरीश भामरे उपस्थित होते.
सदर नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. उदेसिंग पाडवी, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे , शहराध्यक्ष नितीन जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.








