Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

team by team
November 26, 2021
in शैक्षणिक
0
एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई l प्रतिनिधी
ठाकरे सरकारने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन सुरु करण्यास मंजुरी दिली आहे . ग्रामीण भागात पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत . दरम्यान आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही हा निर्णय तूर्त ऐच्छिक असेल . त्यानुसार राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची सक्ती केली जाणार नाही . कोविड -19 बाबत खबरदारीचे उपाय व एसओपी लवकरच जारी करण्यात येईल. राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती . तसेच गेल्या काही दिवसांपासून पालकही आता शाळा सुरु करण्याची मागणी करीत होते .
याआधी पाचवीपासूनचे वर्ग सुरु केले होते . आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरु होणार असल्याने आता राज्यातील सरसकट शाळा सुरु होणार आहेत . पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले लहान असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबतची काळजी प्रामुख्याने शाळांनी घ्यायची आहे . शिक्षक , मुख्याध्यापक नि शालेय प्रशासनाला याबाबतचे आदेश दिले जाणार आहेत . यासंदर्भात आवश्यक नियमावली लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी , तर शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु झालेले आहेत . आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी , तसेच शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्व. मार्तंडराव जोशी यांना ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघातर्फे श्रद्धांजली

Next Post

महाराजस्व अभियानात आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 845 लाभार्थ्यांना जातीचे दाखल्यांचे वाटप

Next Post

महाराजस्व अभियानात आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 845 लाभार्थ्यांना जातीचे दाखल्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add