नंदुरबार l प्रतिनिधी-
विधान परिषदेच्या धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपक प्रभाकर दिघे यांनी भाजपचे उमेदवार अमरीश पटेल , अपक्ष उमेदवार भूपेश पटेल आणि श्यामकांत सनेर यांच्या अर्जावर हरकती घेतल्या होत्या . या हरकतीवर तब्बल ६ तास सुनावणी सुरू होती . त्यामुळे या उमेदवारांसह समर्थकांची धाकधूक वाढली होती . सायंकाळी पावणेसात वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी संबंधितांच्या हरकती फेटाळल्या . त्यानुसार छाननीअंती भाजपचे अमरीश पटेल , काँग्रेसचे गौरव वाणी यांच्यासह पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले .तर
अपक्ष उमेदवार अशोक शंकर पाटील यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला .
धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विधानपरिषद निवडणुकीसाठी सहा उमेदवारांकडून ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते . या अर्जांची काल जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या दालनात छाननी करण्यात आली . छाननीत अपक्ष उमेदवार दीपक दिघे यांनी भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांच्या अर्जावर लेखी हरकत घेतली . त्यात उमेदवारी अर्जातील नमुना २६ मधील काही रकाने रिकामे होते . ते रिकामे ठेवता येत नाही . तसेच फॉर्म एए व बीबी हे कशासाठी भरला यावेळी जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड , उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी सहकार्य केले . तर शिवसेनेचे ॲड.राम रघुवंशी , महेश मिस्तरी व इतर पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते . आहे . त्यावर अमरीश पटेल यांचे वकील ॲड . एस . आर . सोनवणे यांनी बाजू मांडली . तसेच हरकतदारातर्फे ॲड . पी . आर . जोशी यांनी मुद्दा उपस्थित केला . दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आयोग व वरिष्ठांचा सल्ला घेत निकाल जाहीर करीत अमरीश पटेल यांचा अर्ज वैध ठरवला . त्याचप्रमाणे श्यामकांत सनेर , भूपेश पटेल यांच्या अर्जावरही हरकती घेण्यात आल्या . त्याही दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले . ही संपूर्ण प्रक्रिया दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती . त्यानंतर पावणेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडून निकाल देत हरकती फेटाळण्यात आल्याचे जाहीर केल्याने भाजपचे अमरीश पटेल , काँग्रेसचे गौरव वाणी यांच्यासह पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले .तर अपक्ष उमेदवार अशोक शंकर पाटील यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला . जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही बाजूचे समर्थकही थांबून होते . मात्र अर्ज वैध ठरल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला .








