तळोदा l प्रतिनिधी-
तळोदा येथील काँग्रेसचे जुने निष्ठावंत तथा काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र (बापू) जगनसा कलाल यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी करण्यात आली. याबाबतचे नुकतेच नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी मुंबई येथे दिले.
यावेळी राजेंद्र साळी, योगेश शेलकर, व रुउफ पिंजारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सरचिटणीस पद देण्यात आल्याचा उल्लेख या नियुक्तीपत्रात करण्यात आला आहे. यावेळी पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महेंद्र कलाल यांनी सांगितले.
महेंद्र कलाल हे जवळपास तीस वर्षांपासून काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत होते. त्यांच्या आई ताराबाई जगनसा कलाल या २००० साली काँग्रेस कडून तळोदा नगरपरिषदेवर नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या होत्या. तसेच त्यांचे वडील ही मगनसा कलाल हे देखील तळोदा तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. एकूणच कुटुंबातून राजकीय वारसा महेंद्र कलाल यांना लाभला आहे. त्यांच्या या नियुक्तीने तळोदा शहरातुन समाजाच्या सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या राजकीय जीवनात वेळेवेळी पालकमंत्री ॲड. सी पाडवी, माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.पद्माकर वळवी, व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.








