नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज दि.२२२ सोमवार रोजी मतमोजणी झाली त्यात मा. आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा दणदणीत विजय झाला.
बँकेच्या नऊ गटातून १० जागांसाठी २० उमेदवार रिंगणात होते . नंदुरबार वि . का . सोसायटी मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी आणि पावबा माधवराव धनगर यांच्यात लढत होती .डीडीसी बँकेत एकूण 68 मतदारां पैकी मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांना 59 मते पडले तर पावबा माधवराव धनगर यांना फक्त नऊ मते पडल्याने मा. आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा दणदणीत विजय झाला.धुळे येथील वाडीभोकर रस्त्यावरील पारस मंगल कार्यालयात मतमोजणी झाली.दरम्यान दहापैकी सात जागांवर आमदार अमरीश पटेल यांचे उमेदवार विजयी झाले.








