नंदुरबार | प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे . भाजपकडून आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे . तर अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी असतांना काँग्रेसतर्फे ४ नावांची चर्चा असतानाच नंदुरबार पालिकेचे एक नगरसेवक दि. २३ नोव्हेंबर रोजी म्हणजेच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दिवशी अर्ज दाखल करणार आहेत.
अर्ज भरण्याची विद्यमान प्रक्रियाही सुरू झाली . धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे .दरम्यान भाजपकडून नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. विरोधकांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही . कॉंग्रेसनेही निवडणूक लढवण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून काही नावेही कॉंग्रेस निवडणूक समितीने मागविली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातून जिल्हा कॉंग्रेसचे कार्यध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे, तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष व गटनेते गौरव वाणी यांच्या नावाबरोबरच धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नावाची चर्चा असुन या सर्वांना अर्ज भरण्याकामी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

असे असताना नंदुरबार पालिकेचे माजी बांधकाम सभापती तथा विद्यमान नगरसेवक धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी दि.२३ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.
नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक यांनी अर्ज दाखल करण्याची पूर्ण तयारी केली असून दि. २३ नोव्हेंबर रोजी ते अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करणारे नगरसेवक माजी.आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे खंदे समर्थक आहेत.









