नंदुरबार | प्रतिनिधी
चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचा दि.२५ नोव्हेंबर रोजीच्या मंत्रालयावरील धडक मोर्चाबाबत राज्य सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी(गट ड) मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र राज्य येथील पदाधिकारी यांनी नंदुरबार येथे मार्गदर्शन केले.
सदर बैठकीत मध्यवर्ती चतुर्थ श्रेणी महासंघाची जिल्हा कार्यकारिणीची देखील निवड करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणीत भरतभाऊ शिंदे यांची नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच विजय साळुखे यांची कार्याध्यक्ष, दिनकर बारी यांची कोषाध्यक्ष, दिनेश पाटील यांची सरचिटणीस, हिरालाल दाते, श्रीराम जाधव यांची जिल्हा संघटक, कन्हैया पवार, आर.सी.चौरे, सुनिल निकुंभे सल्लागार, विद्या संतोष बंबाळे, रेश्मा राजु गांगुर्डे, कविता बारी यांची महिला संघटक तर प्रमोद कोकणी, भटू भिल, विशाल गावीत यांची सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मंत्रालयावरील धडक मोर्चाबाबत तायडे धुळे, प्रकाश घाडगे राज्य संघटक सातारा, रमेश भोसले सहसंघटक पुणे, श्रीमती सारिका सोनवणे महिला जिल्हा उपाध्यक्ष नाशिक, भिकु साळुखे कार्याध्यक्ष मुंबई, बाबा जाधव नाशिक, दिलीप कडाळे सरचिटणीस पुणे यांनी अनमोल भार्गदर्शन केले. बैठकीचे सुत्रसंचालन डॉ.हेमंत देवकर अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नंदुरबार जिल्हा यांनी केले.










