Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे आदिवासी साहित्य व संस्कृती प्रदर्शन

team by team
November 21, 2021
in शैक्षणिक
0
तळोदा येथे आदिवासी साहित्य व संस्कृती प्रदर्शन

तळोदा l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा व श्री साईनाथ शिक्षण संस्था संचालित अनंत ज्ञानदीप आश्रमशाळा कोठार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सांस्कृतिक भवनात आदिवासी साहित्य व संस्कृती प्रदर्शन संपन्न झाले. आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत व बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित सप्ताहात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नियोजन अधिकारी निर्मल तोरवने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन.एम.साबळे, बी.एफ. वसावे, सुवर्णा सोळंकी, लेखा अधिकारी एस.टी.पावरा, कक्ष अधिकारी डी.जी.वाणी, शिक्षण विस्तार अधिकारी एन.डी.ढोले, जी.डी.अखडमल, बी.आर.मुगळे, बी.एम. कदम, कोठार आश्रमसशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी. एम.पाटील आदी उपस्थित होते.
सुरुवातीला प्रदर्शनात प्रकल्प अधिकारी डाॅ.मैनाक घोष व मान्यवरांच्या हस्ते देवी याहा मोगी, भगवान बिरसा मुंडा, विर एकलव्य यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रकल्प अधिकारी व मान्यवरांनी आदिवासी साहित्य व संस्कृती संग्रहालयातील सर्व साहित्याची पाहणी केली. प्रकल्प अधिकारी मैनाक घोष यांनी कुतुलहाने साहित्य हाताळत त्याबाबत माहिती जाणून घेतली. शाळेचे शिक्षक पन्नालाल पावरा, जयवंत मराठे, योगेश चव्हाण यांनी उपस्थितांना आदिवासी संस्कृतीतील ऐतिहासिक साहित्याची माहिती दिली.
या प्रदर्शनात आदिवासी बांधव आदिम काळापासून वापरात आलेल्या दैनंदिन जीवनातील विविध वस्तू, शस्त्रे, पेहेराव, दागिने, वाद्य अशा दैनंदिन वापरातील ऐतिहासिक व दुर्मिळ साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तळोदा तालुक्यातील कोठार येथील आश्रमशाळेने हे ऐतिहासिक व दुर्मिळ साहित्य जतन करून ठेवले आहे. श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांच्या कल्पनेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करून आदिवासी संस्कृतीचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यत संक्रमित व्हावा म्हणून कोठार येथे आदिवासी साहित्य-संस्कृती संग्रहालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, अभ्यासक, विद्यार्थी यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आदिवासी संस्कृतीच्या साहित्याची व प्रदर्शनाची पाहणी केली. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील चार वजन काट्यात आढळून आली तफावत, वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे केले सील

Next Post

नंदुरबार येथे मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे अधिवेशन

Next Post

नंदुरबार येथे मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add