नवापुर l प्रतिनिधी
तालुक्यातील बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील सद्भाव इंटरप्राईजेस लिमिटेड कंपनीला अवजड वाहनांचे मोजमाप करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे.या ठिकाणी दोन्ही बाजूस २४ वजन काटे आहेत. येथे येणाऱ्या दोन आणि जाणाऱ्या दोन असे एकूण चार वजन काट्यात तफावत आढळून आल्याने वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे सील केले आहेत.
ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसच्या नाशिक, धुळे जिल्हा तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटना यांच्या तक्रारीवरून वजन माप विभागाकडून तपासणी करण्यात आली. १८ नोव्हेंबर रोजी वजन माप उपनियंत्रक गिरनार त्यांचे सहकारी टीम यांनी कारवाई केली आहे.
महाराष्ट्र गुजरात नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील १७ वजन काटे तपासणी करून त्यापैकी ४ वजन काट्यामध्ये अनियमितता(दोष) आढळून आल्याने सिल करण्यात आले.व सदभाव कंपनीला नोटीस देऊन चार काटे वापर करण्यास बंदी करण्यात आली आहे.
त्यांच्या कंपनीच्या असलेल्या काट्यामध्ये फरकाचे लवकर निराकरण करण्याची तंबी देण्यात आली तसे न केल्यास कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे संकेत देण्यात आले.
ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसच्या नाशिक ,धुळे तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटने च्या कार्यालयात वाहनं मालकांकडून नवापूर सदभाव कंपनीचा वजन काट्यात फरक आहे. त्यामुळे वाहन चालकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे अश्या प्रकारच्या तक्रारी वाहन मालकानं कडून आल्या आहेत त्या अनुषंगाने सदभाव कंपनीचे काटे चेक करण्यात आले होते.