Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे ११ हजार ५२ परीक्षार्थी रविवारी देणार टीईटी परीक्षा

team by team
November 19, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार | प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील ३२ परीक्षा केंद्रांवर एकूण ११ हजार ५२ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.

परीक्षा आयोजनासाठी गठीत जिल्हा संनियंत्रण समितीच्या प्रमुख जिल्हाधिकारी मनिषा खत्री तसेच सहप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी केले आहे.

समिती सदस्य पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, प्राचार्य डायट डॉ. जगराम भटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम आहेत तर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी सदस्य सचिव व परीक्षा नियंत्रक म्हणून कामकाज पाहणार आहेत.

दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून पेपर क्र. १ ला १९ परीक्षा केंद्रांवर ६ हजार ९१ परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत. तर पेपर क्र. २ चे आयोजन १३ केंद्रांवर करण्यात आले असून एकूण ४ हजार ९६१ परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

परीक्षेसाठी ८५० अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम तसेच प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांचे भरारी पथक असून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना झोनल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हा परिरक्षक म्हणून सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर.बी.पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील कामकाजाचे सनियंत्रण करण्यासाठी विस्तार अधिकारी-शिक्षण आणि केंद्रप्रमुख यांना सहाय्यक परिरक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण कामकाज पाहणार असून परीक्षा समितीचे सहनियंत्रक म्हणून त्यांना नेमणूक देण्यात आली आहे.राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा संप विचारात घेता परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचण्यासाठी परीक्षार्थ्यांनी आधीच नियोजन करावे. उशिरा येणा-या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याने सकाळ सत्रात १० वाजेच्या आधी तर दुपार सत्रात १.३० वाजेच्या आधी परीक्षा केंद्रांवर पोहचावे असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील खोकसा शिवारात अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान

Next Post

नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

Next Post
नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add