नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना लिमिटेड शेवरे संचलित युनिट नंबर २ आदिवासी साखर कारखाना डोकारे यांचा सन २०२१- २०२२ चा प्रथम गळीत हंगाम गव्हाण पूजन शुभारंभ माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आदिवासी सहकारी साखर कारखाना हा व्दारकाधिश साखर कारखाना लि.शेवरे यांना १५ वर्षापर्यत भाडेतत्वावर देण्यात येत असल्याचे आ.
आ. शिरीषकुमार नाईक यांनी यावेळी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना लिमिटेड शेवरे संचलित युनिट नंबर २ आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे येथील सन २०२१ २२ चा प्रथम गळीत हंगाम गव्हाण पूजन कार्यक्रम राज्याचे माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व नवापूर तालुक्याचे आ. शिरीषकुमार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे शंकरराव आनंदा सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक, सौ. चंद्रकला शंकरराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्दारकाधिश साखर कारखान्याचे संचालक सचिन सांवत,कैलास सांवत,कारखान्याचे कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे,व्दारकाधीश कारखान्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव,पं.स सभापती रतीलाल कोकणी,डी बी गावीत,जि.प सदस्य दिपक नाईक,पं.स सदस्य दारासिंग गावीत,दशरत गावीत,कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,सरपंच नवलसिंग गावीत,विलास वसावे,माजी उपसचिव मंत्रालय प्रकाश वळवी,प्रकाश पाटील, सौ.सयाबाई नाईक,विनाताई वसावे, सह आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा संचालक मंडळ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आ.शिरीषकुमार नाईक म्हणाले की आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे हा अत्यंत चांगला व सुरक्षित सुरु आहे.याचे कारण म्हणजे माझा शेतकर्यांनी वेळो वेळी ऊस देऊन सहकार्य केले आहे.मागील वर्षापासुन कोरोना महामारी सुरु झाल्याने फार अडचणी आल्या होत्या.या कारखान्याला व्दारकाधिश कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सांवत व डी.बी.गावीत यांनी फार सहकार्य केले आहे.आता या वर्षापासुन आदिवासी सहकारी साखर कारखाना हा व्दारकाधिश साखर कारखाना लि.शेवरे यांना १५ वर्षा पर्यत भाडेतत्वावर देण्यात येत आहे.हा कारखाना आपला आहे.सर्व शेतकरी बांधवाना माझी विनंती आहे. आदिवासी सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे.यानंतर व्दारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत म्हणाले की हा कारखाना व्दारकाधीश साखर कारखान्याला चालवायला दिला हा शब्द मला मान्य नाही. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक व माणिकराव गावीत जे जसे तुमचे नेते आहेत तसेच माझे पण आहेत.हा कारखाना मी घेतला ही नाही व त्यांनी दिला ही नाही.या भागात २१ ते २२ वर्ष झाले व्दारकाधिश कारखान्याला मागील वर्षी १ लाख ८० हजार मे. टन ऊस नवापूर तालुक्यातुन घेतलेला होता.दरवर्षी २ लाख व ३ लाख ऊस तोडण्याचे उद्देश ठेवत असतो.मी ठरविले होते की आदिवासी सहकारी साखर कारखान्याला त्याना जेवढा ऊस लागेल त्यांना तेवढा ऊस दयावा .या वर्षी व्दारकाधिश साखर कारखाना लि शेवरे संचलित युनिट नं २ आदिवासी सहकारी साखर कारखान्यात गाळपास येणार्या ऊसाला या वर्षी २५ शे २५ रुपयाचा भाव आम्ही देणार आहोत तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या कारन्याला ऊस दयावा अशी मी विनंती करतो.या नंतर व्दारकाधिश साखर कारखाण्याचे संचालक सचिन सांवत म्हणाले की,जसा विश्वास माजी मंत्री सुरुपसिंग नाईक व आ. शिरीषकुमार नाईक यांनी व्दारकाधिश कारखान्यावर टाकला व सर्व संचालक मंडळ व सभासद कारखाना भाडे तत्वाला देणे बाबत अनुमती दिली व कारखाना व्दारकाधीश ला १५ वर्षा साठी भाडेतत्वार चालवण्यासाठी दिला जो विश्वास आमच्यावर टाकला आहे.त्याचे आम्ही सोने करुन दाखवु यासाठी सर्व शेतकरी बांधवाची साथ आम्हाला पाहीजे आहे.हा कारखाना आपला आहे.यालाच ऊस दयावा असे सांगितले.या नंतर माजी मंत्री सुरुपसिंग नाईक म्हणाले की,आदिवासी सहकारी साखर कारखाना चालवायला दिला आहे तो नेहमी चालु ठेऊन सर्व शेतकरी बांधवाना वेळेवर ऊसाचे पैसे मिळतील.शेतकरी बांधवानी आपल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्याला ऊस दयावा.दुसर्या कारखान्याच्या आमीशाला बळी पडु नका असे सांगितले.या वेळी कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा मातेचा प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.या नंतर वजन काटयाचे पुजन करुन सन २०२१- २०२२ चा प्रथम गळीत हंगाम गव्हाण पूजन शुभारंभ करण्यात आला.यावेळी शासनाने नमूद केलेल्या कोरोना नियमांचे पालन करीत सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे कार्यालय अधिक्षक दिलीप पवार यांनी केले.तर आभार कारखान्याचे सचिव भुपेंद्र वसावे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी कारखान्याचे शेतकी अधिकारी शिवाजी देसाई,व्दारकाधीश कारखान्याचे मुख्यशेतकी अधिकारी विजय पगार व दोघे कारखान्याचे शेतकी विभागाचे अधिकारी कर्मचारी,इंजीनिअर,उत्पादन,अकांऊंट,प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी,कामगार यांनी परीश्रम घेतले.