नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अमर टॉकीज परिसरात तंबाखूयुक्त पान मसाला विक्री करणार्या वर अन्न व प्रशासन विभाग व नंदुरबार शहर पोलिसांची संयुक्त कारवाईत तंबाखूयुक्त पान गुटखा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकार्यांकडून प्राप्त माहितीनुसार , नंदुरबार शहरातील अमर टॉकीज परिसरातील अनिल चौधरी यांच्या किराणा दुकानात तंबाखूयुक्त विमल गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार अन्न व प्रशासन विभाग व दक्षता विभाग नाशिक यांच्या पथकाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकार्यांनी संयुक्त कारवाई करीत अनिल चौधरी यांच्या घरात छापा टाकला असता त्या ठिकाणी अंदाजीत सुमारे चार लाख रुपयांचा तंबाखूयुक्त पान गुटखा आढळून आला. सदर गुटका अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी जप्त करून अनिल चौधरी यांच्यावर कारवाई केली आहे. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आबा पवार, अविनाश दाभाडे यांच्यासह नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे प्रतापसिंह मोहिते, प्रवीण पाटील, मुकेश पवार,भटू धनगर,राहुल पांढरकर आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.