नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुजरात राज्यातील बस सेवा बंद करण्यात आली होती.
कोरोना रुग्णांची संख्या पाहता दि.६ जुलै पासून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच कोरोना ने कहर केला होता.त्यातच गुजरात राज्याला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातही कोरोना रुग्ण संख्या पाहता गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या होत्या.महाराष्ट्रात कोरोना संख्या नियंत्रणात आली आहे.त्यामुळे गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.मंगळवार दि.६ जुलै पासून महाराष्ट्रासाठी बससेवा सुरू होणार आहे.यात पहिल्या टप्प्यात नवापूर, नंदुरबार आणि धुळ्यासाठी बससेवा सुरू करण्यात आली आल्याची माहिती देण्यात आली आहे.या बस सेवेमुळे नागरिकांची सोय होणार आहे.
महाराष्ट्रात बस सुरू करण्याबाबत गुजरात राज्यात प्रशासनातर्फे माहिती देण्यात आली असली तरी अद्याप नंदुरबार व धुळे आगारात या बाबत कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.