नंदुरबार l प्रतिनिधी
दि.बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त जिल्हाभर कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत. बोरद येथून कॉर्नर सभांना सुरवात करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेली संस्था म्हणजेच दि.बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त जिल्हाभर कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत. त्यानिमित्त पहिली कॉर्नर सभा तळोदा तालुक्यातील बोरद गावामध्ये
संघटनेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सुनील रामोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बोरद येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भामरे,जिल्हा उपाध्यक्ष आकाश जावरे . जिल्हा संघटक धनराज इशी, प्रचार व पर्यटन विभाग प्रमुख अजय निकुंभे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख आशिष कुवर यांच्यासह गावासह परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.








