नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नगरपालिका इमारती जवळ नवापूर तालुका भाजपातर्फे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस, भगवान बिरसा मुंडा जन्मदिना निमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,नगरसेवक महेंद्र दुसाने,शहर अध्यक्ष प्रणव सोनार, सप्नील मिस्ञी,कमलेश छत्रीवाले,घनशाम परमार,निलेश प्रजापत, माजी नगरसेविका सुनिता वसावे,जिल्हाकार्यकारनी सदस्या दुर्गा वसावे,अजय गावीत,समिर दलाल,हेमंत शर्मा,भाविन राणा,संजाद बदुडा,सौरव भामरे,आंबादास आतारकर,धनंजय वसावे,आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा कार्याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृणाल दुसाने यांनी केले.तर आभार निलेश प्रजापत यांनी मानले.








