नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील नवापूर चौफुली येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून खा.डॉ. हिना गावीत यांनी अभिवादन केले.
यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावीत, कोळदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुप्रिया गावीत, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, संतोष वसईकर,सुरेंद्र ठाकरे,किरण पाटील ,विजू नाईक,शिवा गावीत,सोनवणे ,पंकज गावीत,रवि वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व समाज बांधव उपस्थीत होते.

देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या निर्णयान्वये भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस दि.१५ नोव्हेंबर जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली याबाबत आनंद व्यक्त करीत खा.डॉ. हिना गावित यांनी पंतप्रधांनांचे आभार मानले.








