Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तुलसीविवाहानंतर उडणार लग्नांचा धुराळा, नोव्हेंबर ते जुलैपर्यंत ६३ विवाहमुहूर्त

team by team
November 14, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार | प्रतिनिधी

भारतीय परंपरेनुसार तुलसी विवाहानंतर विवाहांना प्रारंभ केला जातो. परंपरेला धरून रितीरिवाजानुसार लग्न समारंभ रूढी-परंपरा मानत १९ नोव्हेंबरपासून म्हणजे तुलसीविवाहानंतर विवाह समारंभास सुरुवात होणार आहे.नोव्हेंबर ते जुलैपर्यंत ६३ विवाहमुहूर्त आहेत. पावणेदोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली अनेक विवाह घरघुती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले. यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे खर्चिक होणार असून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून लग्न समारंभासाठी खर्च करण्याची तयारी केली आहे.
तुलसी विवाहानंतर खर्‍या अर्थाने विवाहसोहळे सुरू झाल्याने मंडपवाले, बँड पथके, मंगलकार्यालये, फूले, हार, गुच्छ विक्रेते, प्रिंटिंग प्रेस यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार असून कापड बाजार फुलणार आहे. शेकडो तरुणांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार असून आर्थिक उलाढाल वाढणार आहे.
यंदाचे लग्नाचे मुहूर्त
नोव्हेंबर २०२१- २०, २१, २९, ३०, डिसेंबर-१, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९. जानेवारी २०२२-२०, २२, २३, २७, २९, फेब्रुवारी-५, ६, ७, १०, १७, १९, मार्च– २५,२६, २७, २८, एप्रिल-१५, १७, १९, २१, २४, २५, मे-४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२,२५, २६, २७, जून-१, ६,८,११,१३, १४, १५, १६, १८, २२,जुलै-३,५,६,७,८,९.

यावर्षी नोव्हेंबरमध्ये चार, डिसेंबरमध्ये ११, जानेवारीत पाच, फेब्रुवारीत सहा, मार्चमध्ये चार,एप्रिलमध्ये सहा, मेमध्ये ११, जूनमध्ये दहा व जुलैत सहा विवाह मुहूर्त आहेत.यंदा नोव्हेंबर व मार्चमध्ये सर्वांत कमी चार विवाह तिथी आहेत.
तुलसी विवाहानंतर २० नोव्हेंबरपासून विवाह सोहळ्यांना सुरुवात होत आहे. यावर्षी ६३ मुहूर्त आहेत. मोठ्या प्रमाणात तारखा असल्याने वधू वर पित्यांना वधू-वर पसंतीसाठी अवधी मिळणार आहे. मार्च महिन्यात कमी तारखा असल्या तरी इतर महिन्यात मोठ्या प्रमाणात तारखा आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी केली सातपुड्यातील कुकलट येथे जलसंधारण कामाची पहाणी

Next Post

सातपुड्यातील चार किलोमीटरचा डोंगर पारकरीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी जाणल्या नागरीकांच्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add