धडगांव l प्रतिनिधी
अक्राणी तालुक्यातील कुकलटपाडा येथे जलसाक्षरता समितीने केलेलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद येथील समुत्कर्ष बालविकास संस्थेच्या पंचवीस विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.
सहलीचे आयोजक विवेक चांदोडकर यांनी जलसंधारणाच्या कामाचे महत्वं विद्यार्थ्यांना सांगितले आणि या कामा विषयी समाधान व्यक्त केले.
परिसरातील झरे, तलाव, नाले, डोंगर, पक्षी वनस्पती पीकं आणि लोकजीवन आदिंच्या विविधतेने विद्यार्थी प्रभावीत झाले होते. वनस्पतींची वैशिष्ट्ये, उपयोगीता आणि कुकलट येथील जलसंधारणाच्या कामाची माहिती प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांनी दिली.
सहलीचे संयोजनात वैष्णवी चांदोडकर यांनी मोलाची भुमिका निभावली. भरत पावरा, सुनील परमार, किसन पावरा ,चंद्रकांत शिंदे, जितेंद्र पावरा, राजेंद्र पावरा, सुभाष पावरा, पोपट पावरा, चंद्रासिंग पावरा आदिंनी सयोजन सहाय्य केले. या प्रसंगी कुकलट ग्रामस्थांनीही जलसंधारणाच्या कामाची माहिती संयोजकांना दिली.