नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील धनाजे बु . चा डुमटीपाडा येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
धनाजे बु . चा डुमटीपाडा येथून फिर्यादीच्या राहत्या घरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून तिघांनी संगनमत करून पळवून नेले.याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडील यांनी संशयीत आरोपी यांना आमची मुलगी परत दया असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीस वाईट वाईट शिवीगाळ करून फिर्यादीच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादीवरून वाहऱ्या जाहग्या पावरा, भरत उर्फ भोग्या वाहऱ्या पावरा दोन्ही रा . धनाजे बु . ता . धडगाव ३ ) राहुल शिलदार पावरा रा . प्रिपी ता . धडगाव यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी पुढील तपास पोना स्वप्नील गोसावी करीत आहे.










