Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचा पाठिंबा

team by team
November 14, 2021
in सामाजिक
0
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचा पाठिंबा

नंदुरबार l प्रतिनिधी
सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांची जीवनवाहिनी ठरलेल्या लालपरी अर्थात एसटीची चाके थांबल्यामुळे प्रवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र कामगारांच्या मागण्या रास्त असून त्यास ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी प्रणित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ नंदुरबार शाखेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,शासनासह राज्य परिवहन महामंडळ आणि परिवहन खात्याच्या निदर्शनास आणू इच्छितो की, राज्यातील एसटी महामंडळात अनावश्‍यक कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी थांबवावी. प्रत्येक प्रवाशांकडून अपघात सहायता निधी अंतर्गत प्रत्येक तिकिटावर एक रुपया प्रमाणे निधी वसूल करण्यात येतो. याद्वारे दुर्दैवाने एसटीला अपघात होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांचा निधी देण्याची तरतूद आहे. याबाबत लाखो प्रवाशांकडून दररोज वसूल होणाऱ्या निधीबाबत सांशकता आहे. निधी कुठे जमा होतो याची माहिती प्रवाशांना पर्यायाने जनतेला मिळणे गरजेचे आहे. यात पारदर्शकता असावी. राज्यातील सर्व बसस्थानके, आगार ,कार्यशाळा, विभागीय कार्यालय यांच्या इमारती व जागांचे बाजारभावाप्रमाणे ऑडिट करून होणारी किंमत जाहीर करण्याचे धाडस शासनाने दाखवावे तसेच खाजगीकरणाच्या घाट यामुळे एसटी डबघाईस आली आहे. यातुन ग्रामीण भागातील प्रवासी सेवा ठप्प होणार आहे. अत्यंत अल्प वेतनावर काम करणाऱ्या आणि हजारो प्रवाशांच्या जीवाची काळजी घेणारे चालक-वाहक व कर्मचारी यांच्यावर करण्यात येणारी निलंबनाची कारवाई देखील मागे घेण्यात यावी तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अर्थात गाव तेथे एसटी व प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य घेऊन अविरत सेवा देणाऱ्या एसटीला पूर्ववत गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक योगेश्वर जळगावकर व सदस्यांनी केली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक योगेश्वर जळगावकर, उपाध्यक्ष अँड.निलेश देसाई , डॉ. गणेश ढोले, सचिव अशोक यादबोले, सहसचिव गोपाल लगडे , महिला सदस्य पुनम भावसार, प्रा.गिता जाधव, तसेच सदस्य दर्शन ठक्कर, सुरेश जैन,नितीन पाटील, रघुनाथ अहिरे, प्रसाद अर्थेकर, वैभव करवंदकर , कमलाकर मोहिते, भरत माळी आदी उपस्थित होते. नंदुरबार आगारात उपोषण स्थळी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ, नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांना निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

शहादा येथे विटा उचलन्याच्या वादातून तरूनाच्या पोटात सुरा भोसकला

Next Post

शहादा येथे विटा उचलन्याच्या वादातून तरूनाच्या पोटात सुरा भोसकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add