Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मामाचे मोहीदा शिवारातून भरारी पथकाने अवैध बियरसह 22 लाखाचा मुद्देमाल केला जप्त, दोघांना अटक

team by team
November 13, 2021
in क्राईम
0
मामाचे मोहीदा शिवारातून भरारी पथकाने अवैध बियरसह 22 लाखाचा मुद्देमाल केला जप्त, दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधि
मामाचे मोहीदा ता. शहादा शिवारात मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दबंग कामगिरी करीत परराज्यातील अवैध बियरचे 520 बॉक्स एकूण 21 लाख 25 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकास खात्रीशीर माहिती मिळाली होती.त्यानुसार मामाचे मोहीदा ता. शहादा शिवारातील नवीन तहसील कार्यालया समोरील रस्त्यावरून मोहिदा रोड ता. शहादा ठिकाणाहून पहाटेच्या सुमारास एका सहाचाकी टाटा कंपनीचा टेम्पो (क्र. जी.जे.-07-जे -7351) या मालवाहू टेम्पो मधून महाराष्ट्र शासनाच्या महसूल बुडवून मध्यप्रदेश राज्यातून आयात केलेल्या व फक्त मध्यप्रदेश राज्यात विक्रीकरता निर्मित केलेल्या परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीकरता प्रतिबंधित असलेल्या अवैध बियर साठ्याची विक्री करण्याच्या उदेशाने बेकायदेशीर वाहतूक केली जाणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये अटक केलेल्या दोन आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या परराज्यातील अवैध बियरचे 520 बॉक्स जप्त करून त्यांच्या ताब्यातून 21 लाख 25 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65-ए, व सी,81,83, 90,अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार निरीक्षक मनोज चव्हाण तसेच जवान अमोल चिलगर, धनाजी दळवी, अविनाश जाधव यांनी प्रत्यक्ष कारवाईत भाग घेतला, त्यात स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी याकार्यवाही दरम्यान मदत केली. सदर गुन्ह्याचे फिर्याद अमोल चीलगर यांनी दिली असून पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई मनोज चव्हाण हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव यावर्षीही रद्द,यावेळी घेता येणार दर्शन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त

नंदुरबार जिल्ह्यातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add