प्रकाशा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव यावर्षीही रद्द करण्यात आला आहे. आज आयोजित सभेत हा ठराव सर्वांनुमते घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तीकी पौर्णिमेला दरवर्षी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना या महाभयंकर आजारामुळे सर्वत्र थैमान पसरले आहे. यामुळे यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी असलेला कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार भाविकांना दि.१८ नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १९ नोव्हेंबर रोजी शुक्रवार रोजी रात्री १२ पर्यंत दर्शन घेता येणार आहे.यावेळी सामाजिक आंतर ठेवून व मास्क लावून दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे.








