नंदुरबार l प्रतिनिधि
महाराष्ट्र शासनाव्दारे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांचे शासकीय सेवेत विलीगीकरण करून घेण्याबाबत सुरू असलेल्या कर्मचार्यांच्या संपाला कुणबी पाटील युवा मंच , नंदुरबार जिल्ह्या व आशापुरी फाऊंडेशनतर्फे पाठींबा देण्यात आला.
यावेळी निवेदनात म्हटले आहे कि, कुणबी पाटील युवा मंच नंदुरबार जिल्हा यांच्यावतीने आम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांच्या सुरू असलेल्या संपास जाहीर पाठींबा देत आहोत . एस.टी.महामंडळातील सर्व कर्मचार्यांना शासनाने शासकीय सेवेत विलीगीकरण करून घ्यावे . तसेच वर्षानुवर्षे दिवस रात्र सेवा बजावणार्या या सर्व कर्मचार्यांना इतर सर्व राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणेच वेतन व त्या संबंधीतील सर्व सोयीसुविधा शासनाने त्वरीत लागू कराव्यात . यासाठी कुणबी पाटील युवा मंच , नंदुरबार वतीने शासनास विनंती करीत आहोत . कर्मचार्यांनी सुरू केलेल्या या संपाला जाहीर पाठींबा देखील देत आहोत . शासनाच्या वतीने सदर संपामुळे कर्मचान्यांवर अन्यायकारक कार्यवाही करू नये अशी विनंती शासनास करीत आहोत . तसेच हे कर्मचारी जे वर्षानुवर्षे कमी पगारावर काम करीत असून आता तरी या कर्मचार्यांचा व त्यांच्या परिवाराचा विचार या सरकारने करावा . आणि या संपात मृत्युमुखी झालेल्या कर्मचार्यांच्या परिवारावर आलेले संकट दूर करून त्यांनाही योग्य तो न्याय द्यावा . पुनश्च एकदा कुणबी पाटील युवा मंच , नंदुरबार जिल्हा वतीने या संपाला जाहीर पाठींबा देत असून शासनाने यावर त्वरीत निर्णय घेऊन कर्मचार्यांना व संपामुळे जनतेस देखील फार काळ वेठीस धरू नये म्हणून सदरच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी दिनेश पाटील, प्रदीप देसले , रविंद्र पाटील, किशोर पाटील, हिरामण पाटील, दिग्विजय पाटील, नितिन सनेर, निलेश पाटील, ललित सुर्यवंशी, हे पदाधिकारी उपस्थित होते.








