नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील जगतापवाडी जवळील महादेव नगरात बंद घरात चोरट्यांनी डल्ला टाकत १ लाख ९६ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.दोन दिवसात नंदुरबार शहरात तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे पसरली आहे
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
शहरातील जगतापवाडी जवळील महादेव नगरात राहणाऱ्या राजेंद्र विसपुते हे कुटुंबीयांसोबत बाहेर गावी गेले असता काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घर हेरून घराचे कुलूप तोडून घरातील १ लाख ९६ हजार ३०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.सदरची बाब घराशेजारी राहणाऱ्या मयंक शितोळे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी
राजेंद्र विसपुते यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क केला.त्यानंतर तेथे पोलिसांना पाचारण करण्यात आले.याप्रकरणी घरा शेजारी राहणाऱ्या मयंक शांताराम शितोळे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर करील आहे.दरम्यान दिवसाआधी नंदुरबार शहरात दिवसा दोन घरफोडी होऊन ९ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती.शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.








