नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी प्रविण कंचनलाल लोहार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या सुचनेनुसार नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी काँग्रेस सेवा दलाच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी प्रविण कंचनलाल लोहार यांची नियुक्ती केली आहे. नंदुरबार येथील जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रविण कंचनलाल लोहार यांना काँग्रेस सेवा दलाच्या नंदुरबार शहराध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी दिले. तसेच प्रविण लोहार हे विविध पदांवर कार्यरत आहेत. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल पाटील, खंडेराव पवार, माजी नगरसेवक ईकबाल खाटीक, दत्तु पवार, गुलाब माळी, अजित कुलकर्णी, जमिल पिंजारी, काशिनाथ पाटील, रामा ठेलारी, राजु पाटील, इरफान खाटीक, इमरान मोमीन, सद्दाम मोमीन, कार्यालयीन प्रमुख प्रविण शेलार आदी उपस्थित होते.








