Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.आरोग्य कर्मचार्‍यांच्या समस्या लवकरच सुटणार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे आश्‍वासन

team by team
November 10, 2021
in आरोग्य
0
जि.प.आरोग्य कर्मचार्‍यांच्या समस्या लवकरच सुटणार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे आश्‍वासन

नंदुरबार l  प्रतिनिधी

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी जि.प.प्रशासन तत्पर आहे. सर्व समस्या अंतिम टप्प्यात असून लवकरच सुटतील, असे ठाम आश्‍वासन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना कोणत्याही आंदोलनात सहभागी नसल्याचे पत्र दिले. याप्रसंगी बोलतांना श्री.गावडे यांनी आरोग्य कर्मचार्‍यांची कालबध्द पदोन्नती, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांची पदोन्नती, जीपीएफ/डीसीपीएस रकमेचा हिशोब आदी समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी जि.प.प्रशासन कटीबध्द असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार जिल्ह्याचा लसीकरणाचा आढावा घेतला असता हर घर दस्तक मोहिम राबविण्यासाठी सर्व विभागांनी युध्दपातळीवर तयारी केली आहे. यात आरोग्य कर्मचारी उत्कृष्ट काम करतील, असा मला विश्‍वास आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना कोणीही वेठीस धरु नये व हर घर दस्तक मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.एल.बावा, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजीव वळवी उपस्थित होते.
जि.प.आरोग्य कर्मचार्‍यांच्या आंदोलनात सहभाग नाही
जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलनात जि.प.आरोग्य कर्मचारी सहभागी नसल्याचे पत्र देण्यात आले आहे. आरोग्य कर्मचार्‍यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोळ व प्रशासनाच्या प्रयत्नामुळे समस्या आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. जि.प. आरोग्य कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारलेले नसून समस्या सनदशीर मार्गाने सोडविण्यावर भर दिला आहे. मात्र जि.प.शी कोणताही संबंध नसतांना एका तथाकथीत संघटनेने केवळ श्रेय घेण्यासाठी आयत्या पीठावर रेघोट्या मारण्यासाठी पुढे येत आहे. जि.प.आरोग्य कर्मचार्‍यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता कोणताही संप, धरणे आंदोलनात सहभागी होवु नये, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते, सरचिटणीस संजय मोहिते, तालुकाध्यक्ष संजय पावरा, सुरेश वसावे, योगेश पाटील, भूपेंद्र चौधरी, रियाज सैय्यद, महेंद्र घुगे, हितेंद्र बडगुजर, सागर शर्मा, सुनिल मोरे, मनोज बागुल, लक्ष्मण साठे, श्रीमती गिता वसावे, श्रीमती कला पाडवी, श्रीमती सुशिला भादले, श्रीमती प्रतिभा गवांदे आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आंदोलनात जि.प.प्रशासन फूट पाडण्याच्या करीत आहे प्रयत्न, बेमुदत उपोषण होणारच: महासंघाचा इशारा

Next Post

कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांचे वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जणांना अटक

Next Post
कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांचे वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जणांना अटक

कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांचे वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add