नंदुरबार | प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नंदुरबार जिल्ह्याचे पद नीति सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील रामोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारीणी घोषीत करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा पद नियुक्ती कार्यकारणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल होते. दे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सुनील रामोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यात जिल्हा उपाध्यक्ष पदी आकाश जावरे, नंदुरबार जिल्हा सचिव पदी राहुल वाघ, नंदुरबार जिल्हा महासचिवपदी पुष्पेन्द्र महाले, नंदुरबार जिल्हा संघटकपदी धनराज ईशी,सौरक्षण विभाग प्रमुखपदी कृष्णा आप्पा पेंढारकर, पर्यटन विभागप्रमुख अजय निकुंबे, कोषाध्यक्ष नागसेन साळवे, जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ पेंढारकर, संस्कार विभाग प्रमुख गणेश पवार यांचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सुनील रामोशी यांच्या हस्ते पद नियुक्ती करून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अजय निकुंबे यांनी केले.








