अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील आमलाबारी येथील गावालगत असलेल्या नदीवर स्नान करण्यासाठी गेलेल्या बालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना एका युवकासह त्याच्या मावशीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना
आज दि . 6 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की , शहादा शहरातील गांधीनगर भागात राहणारे सज्जात शेख हे अक्कलकुवा येथे एका संस्थेत शिपाई पदावर काम करतात . सध्या सुट्टी असल्याने ते शहादा येथे आले होते . मयत फैजान शेख सज्जात ( वय २१ )
हा विद्यार्थी बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता . आज सकाळी आपली मावशी नौरून्नीसा अश्पाक तेली ( वय ३५ ) व तिचे दोन मुले असा सर्व परिवार अक्कलकुवा तालुक्यातील आमलाबारी येथे फिरण्यास गेले होते . दुपारी आंघोळ करीत असताना त्यांच्यासोबत असलेला एक बालक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच फैजान शेख हा त्याला वाचवण्यासाठी गेला . त्यावेळी त्याची मावशी नौरूणन्नीसा तेली याही त्याला सहकार्य करण्यासाठी गेल्या असता बालक वाचला . परंतु यात फैजान शेख व नौरूण्णीसा तेली या दोघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . या घटनेची माहिती मिळताच शहादा शहरात तेली समाज गांधीनगर भागात शोकाकुल वातावरण झाले . शहादा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख बशीर यांनी याबाबत अक्कलकुवा पोलीसांशी संपर्क साधून तातडीने मदतीचे पोलीस प्रशासनाला विनंती केल्यामुळे दोघा मयतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले .










