नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना शहीद पोलीस अमंलदारांच्या घरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी
दिवाळी साजरी केली.नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पुन्हा संवेदनशील अधिकारी असल्याचा प्रत्यय आला. त्यांच्यामुळेच कोरोना शहीद पोलीस अमंलदारांच्या घरात दिवाळी साजरी झाली.
मानवी जीवनावरील मागील 100 वर्षातील बहुधा सर्वात मोठा जागतिक स्तरावर पसरलेला संसर्गजन्य रोग म्हणजेच कोविड -19 अर्थात कोरोना वायरस . सन 2019 मध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण जगावर कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचे सावट पसरले होते . पोलीसांचा सामान्य जनतेशी सरळ संपर्क येत असल्यामुळे त्यांना कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा धोका सर्वात जास्त होता . कोणत्याही प्रकारचे औषध किंवा ल उपलब्ध नसतांना पोलीसांनी कोरोना सारख्या अदृष्य शत्रुशी दोन हात करुन आज त्यावर मात केलेली आहे . या संसर्गजन्य रोगाची भयानकता याच गोष्टीवरुन लक्षात येऊ शकते की , जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही दोन कोटी पेक्षा जास्त असुन सुमारे 5 लाखापेक्षा जास्त लोकांना यात आपला जिव गमवावा लागलेला आहे . इटली , इराण , फ्रान्स अमेरिका यासारख्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाची वैद्यकिय व्यवस्था आणि सुसज्जतेसाठी जगात प्रसिद् असणारे देश आज अक्षरश : या विषाणुसमोर हतबल झालेले होते . इटली सारख्या वैद्यकिय क्षेत्रात प्र असणाऱ्या देशाने जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) समोर समर्पण करुन दिलेले आहे . ज्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे आणि ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना गंभीर रोग आणि मृत्यु होण्याचा धोका जास्त असतो , यावर उपाय म्हणून प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल यासाठी प्रयत्न करीत होते , परंतु पोलीस मात्र कसलीही काळजी न करता रस्त्यावर , चौका चौकात रात्रंदिवस तहान भुक विसरुन उभे राहुन रक्ताचे पाणी करुन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले होते . कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवली किंवा 10 टक्के कर्मचारी हजर ठेवले होते , अशावेळी आपले पती , पत्नी , मुलबाळ , आई वडील यांच्यापासुन दुर राहुन जनतेच्या हितासाठी आपल कर्तव्य बजावणारे Front Line Warrior अर्थातच पोलीस . संपुर्ण जग लॉकडाऊन होवुन घरी बसलेले असतांना पोलीस विभागाला मात्र घरात बसुन लॉकडाऊन होता येणार नव्हते तर रस्त्यावर , चौका चौकात रात्रंदिवस तहान भुक विसरुन कोरोना विरुध्द् युध्द् करायचे होते . देश सेवेची शप्पथ घेवुन घराबाहेर पडलेल्या पोलसांना देखील संवेदना असतात ते देखील माणुसच त्यांनाही भावना असतात . कर्तव्या सोबतच पोलीसांनी आपली आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची देखील काळजी घेत होते . कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असतांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 23 पोलीस अधिकारी व 227 पोलीस अमंलदारांना कोरोनाची लागण झाली होती . सर्व अधिकारी व अमंलदारांनी औषधोपचार घेतले , त्यामुळे ते कोरोना आजारावर यशस्वीरीत्या मात करुन पुन्हा कर्तव्यावर हजर झाले , परंतु 5 पोलीस अमंलदार हे कोरोना आजारावर मात करण्यात अपयशी ठरल्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 5 पोलीस अमंलदार हे कोरोना आजाराने शहीद झाले . यामध्ये शहादा पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलले सहा पोलीस उप निरीक्षक दिपक हरिशचंद्र फुलपगारे हे दि. 5 सप्टेंबर 2020 रोजी, म्हसावद पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले सहा . पोलीस उप निरीक्षक कैलास मधुकर चव्हाण हे दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी, सारंगखेडा पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले असई रमेश शिवराम पाटील हे दी. 20 मार्च 2021 रोजी, सहा . पोलीस उप निरीक्षक मानसिंग बबनसिंग गिरासे हे दि. 14 एप्रिल 2021 रोजी तर पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार शशिकांत सत्यपाल नाईक हे दि. 27 मार्च 2021 रोजी कोरोना विषाणुशी लढत असतांना शहीद झाले . शहीद झालेल्या पोलीस अमंलदारांच्या घरी यंदा दिवाळीचे दिवे लागणार नाही कारण त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोनाशी दोन हात करतांना कर्तव्यावर शहिद झाला होता , त्यांच्या घरात दुःखाचे व निराशेचे वातावरण होते . शहीद झालेले पोलीस अमंलदार हे आपल्याच कुटुंबातील सदस्य होते हे विसरुन न जाता शहिद पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयांच्या घरी देखील दिवाळी व भाऊबीज साजरी व्हावी अशी संकल्पना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून मांडली . त्या संकल्पनेवर तात्काळ अमंलबजावणी करुन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी शहीद पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयांच्या घरी जावून त्यांच्या दुःखात सहभागी होवून कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेवून त्यांचे सांत्वन केले . तसेच शहिद पोलीस अमंलदारांच्या कुंटुंबीयांसोबत दिवाळी व भाऊबीज साजरी केली . शहिद पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयांचे दुःख कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न मा.पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केला . शहीद कुटुंबीयां प्रती असलेली तळमळ व सहानुभुती पाहता शहिद कुंटुंबीयांकडुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असुन त्यांचे आभार व्यक्त केले . तसेच सर्व स्तरातुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे . या कार्याक्रमाचे वेळी पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) , नंदुरबार विश्वास वळवी , उप – विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे , शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार हे उपस्थित होते .