Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पत्रकार संघाचा दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात, पत्रकारांचे प्रशासनाला उत्कृष्ठ सहकार्य – पोलीस अधीक्षक पाटील

team by team
November 4, 2021
in सामाजिक
0
पत्रकार संघाचा दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात,  पत्रकारांचे प्रशासनाला उत्कृष्ठ सहकार्य – पोलीस अधीक्षक पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहर व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव विशाल माळी, जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमाकांत पाटील, रमेश महाजन, संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र, साप्ताहिके, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास व वारसा याबाबत माहिती देताना 75 पेक्षा अधिक वर्षांचा जिल्ह्यातील पत्रकारितेचा वारसा असून, नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून एक आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. रमाकांत पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पत्रकार संघाचा इतिहास सांगतानाच जिल्ह्यातील पत्रकारांनी राजकीय व प्रशासकीय दोन्ही बाजू सांभाळत उत्कृष्ट पत्रकारिता केल्याचे विधान केले. रमेश महाजन यांनी कोरोना काळात नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांनी पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून कार्य केल्याचे सांगितले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्यातून अतिशय दुर्गम भागातील जनतेच्या समस्या मांडण्यासाठी पत्रकार जिवाचे रान करत असल्याचे सांगून जिल्ह्यातील पत्रकारांनी नंदुरबार जिल्हा निर्मितीपासून विविध बाबींमध्ये उत्कृष्ट कार्य केले केल्याचे स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी आपण जिल्ह्यात येण्याआधी तीन ‘प’ चा अभ्यास केल्याचे सांगून, नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारितेबाबत या ठिकाणी काम करून गेलेल्या सर्वच अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली असल्याचे सांगत नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांकडून जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जिल्ह्यातील विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यात दिव्य मराठी वृत्तपत्र जिल्हा प्रतिनिधी रणजीत राजपूत यांचा चित्रपटातील कामाबद्दल बेस्ट ऍक्टर पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी जगदीश जयस्वाल यांना देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान तसेच प्रसार भारतीचा बेस्ट स्टोरी अवार्ड प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दैनिक लोकमतचे उपसंपादक मनोज शेलार यांना बाबा दळवी शोधपत्रकारिता पुरस्कार व महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब पोतनीस उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक रमाकांत पाटील यांना लोकमतचा कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच दैनिक देशोन्नतीचे उपसंपादक महादू हिरणवाळे यांची सहकार भारती जिल्हा संघटन मंत्री या पदावर निवड झाल्याबद्दल, सर्कल न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी दीपक कुलकर्णी यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेतर्फे अल्पोपहार देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संघाकडून उपस्थित सर्व पत्रकारांना उत्तम प्रतीची लेखणी भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार देवेंद्र बोरसे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

विशेष लसीकरण शिबीरास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात 65 हजार 306 लसवंत

Next Post

एकात्मीक आदिवासी विकास समितीच्या नंदुरबार प्रकल्प अध्यक्षपदी दिलीप नाईक यांची तर तळोदा प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी गीता पाडवी यांची नियुक्ती

Next Post
एकात्मीक आदिवासी विकास समितीच्या नंदुरबार प्रकल्प अध्यक्षपदी दिलीप नाईक यांची तर तळोदा प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी गीता पाडवी यांची नियुक्ती

एकात्मीक आदिवासी विकास समितीच्या नंदुरबार प्रकल्प अध्यक्षपदी दिलीप नाईक यांची तर तळोदा प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी गीता पाडवी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add