तळोदा | प्रतिनिधी
प्रपत्र ‘ड’ यादीत सुटलेली नावे समाविष्ट करणे, पेसा निधी व इतर कल्याणकारी योजना पारदर्शकपणे राबविण्यात याव्यात यासाठी बिरसा फायटर्सच्या वतीने तळोदा गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी १५ ते २० मिनिटे सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
तसेच शहरी भागाप्रमाणे खेडेगावातही पंतप्रधान आवास योजनेचे २ लाख ४० हजार रुपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे. ग्रामीण भागातही शहरी भागाप्रमाणे रेती, सिमेंट, लोखंड, विटा, खडी आदी बांधकाम साहित्य हे त्याच किंमतीत मिळते. याउलट ग्रामीण भागात वाहतूक खर्च जादा आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत बांधकाम साहित्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना १ लाख ४० हजार रुपयांत आपले स्वतःचे घर बांधणे शक्य होत नाही. त्यासाठी अनुदान वाढवून देण्यात यावे.
तसेच तालुक्यातील, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत प्रपत्र ‘ड’ यादीत सुटलेली नावे समाविष्ट करून त्यांनाही घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी निवेदन बिरसा फायटर्सचे वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, कार्याध्यक्ष भरतसिंग पावरा, विभागीय संघटक जगदीश वळवी, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, राजू प्रधान, विरसिंग पाडवी, रतिलाल पावरा, संतोष गावीत, बारक्या पावरा, इंदास पावरा, विजय खर्डे, डॉ.जगन पाडवी, सायका पावरा, महेंद्र तडवी, मनेश खर्डे, विजय खर्डे, हिरामण खर्डे, हेमंत ठाकरे, विजय खर्डे, हिरामण ठाकरे आदींच्या सह्या आहेत.