Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सीईओ रघुनाथ गावडे यांचा राज्य शासनातर्फे गौरव

team by team
October 31, 2021
in आरोग्य
0
सीईओ रघुनाथ गावडे यांचा राज्य शासनातर्फे गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी

कोरोना कालावधीत जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचा राज्य शासनातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी राज्य शासनाचे प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या सुपूर्द केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अथक परिश्रम करून कोरोनाची लाट रोखण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातील अनेक गावांपर्यंत यामुळे कोरोनाला प्रवेश करता आला नाही.
कोरोनाने जेथे थैमान घातले त्या-त्या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी मदतीला धावून गेले व नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा परिषद स्तरावरील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून ग्राम पंचायत स्तरावर विलगिकरण कक्ष तयार करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांनी तसेच ग्राम सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी जीवाचे रान करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सीईओ रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाला रोखण्यात यश आल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री श्री राजेंद्र पाटील, आरोग्य सचिव डॉ.प्रदीप व्यास व महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आयर्न मॅन सरदार वल्लभभाई पटेल एक लढवय्ये नेते

Next Post

नंदूरबार पोलीसांच्या कर्तृत्वावर उप महनिरिक्षकांची कौतूकाची थाप, परिक्षेत्रातील पोलीस दलाच्या कार्यकुशलतेचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add