नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात आज एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव आला. तब्बल २५ दिवसानंतर जिल्ह्यात कोरोना रूग्ण आढळला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दि.१३ ऑक्टोबर रोजी तळोदा व नंदुरबार येथील प्रत्येकी एकजण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा तुर्त कोरोनामुक्त झाला होता. आज प्रशासनातर्फे ५८ जणांचे आरटीपीआर चाचणी करण्यात आली. पैकी नंदुरबार शहरातील एक जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आला. तब्बल २५ दिवसानंतर नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ५४९ कोरोना रग्ण आढळून आला पैकी ३६ हजार ५९८ जण कोरोनामुक्त झाले आहे. तर ९५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्या सण उत्सावाचा पार्श्वभुमीवर बाजारात मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.








