नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी ग्रामपंचायतीकडे थकबाकीमुळे पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे तीन दिवसापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात घरपट्टी वसुली करण्यास सुरुवात झाली असून, ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांकडे आतापर्यंत ५० लाख ९१ हजार २२८ रुपये थकबाकी असल्याने ग्रामपंचायतीस मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ग्रामपंचायतिची निवडणूक आली तेव्हा गावातील ठराविक लोक घरपट्टी भरतात तर ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून दाखला पाहिजे तेव्हा घरपट्टी पैकी पाचशे ते हजार रुपये देऊन वेळ मारून नेली जाते.त्यामुळे ग्रामपंचायतीचा थकबाकीचा आकडा दर वर्षी वाढत जातो. काही ग्रामस्थांकडे वीस वर्षे पेक्षा अधिक घरपट्टी असल्याची माहिती ग्रामसेवक निकम यांनी दिली. विद्युत मंडळाचे स्ट्रीट लाईटचे विद्युत बिल ग्रामपंचायतीने भरले. गावातील दोन वॉटर सप्लाय चे प्रत्येकी १७ लाख रुपये बाकी आहे. एप्रिल पासून ग्रामपंचायतीकडे सहा बिले बाकी आहेत. वॉटर सप्लायचे मागील बिल ८० हजार रुपये बाकी आहेत. वीज मंडळाकडून ग्रामपंचायतीस अडीच महिन्यांपासून वेळोवेळी विज बिल भरण्याची जाणीव करून देण्यात आली , मात्र विज बिल न भरल्या अखेर तीन दिवसापूर्वी पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. ग्रामपंचायत व विद्युत कंपनीच्या कारभारामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली असल्याने गावाच्या जवळपास पाणी लवकर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.लवकर वीज बिल भरून लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने पाणी समस्या झाली आहे विहिरीला पाणी आहे परंतु वीज पुरवठा खंडित झाल्याने व जवळपास पाणी उपलब्धता कमी असल्याने ग्रामस्थांना जंगलातून पाणी आणावे लागते मी येथून चार किलोमीटर धामडोद शिवारात असलेल्या शेतातून पाणी आणत आहे.
रवींद्र शांताराम पाटील, ग्रामस्थ खोंडामळी.
खोंडामळी सब स्टेशन अंतर्गत वीस पाणी व पुरवठा साठी वीज जोडणी दिली आहे, त्यापैकी बहुतेकांनी चालू बिलातील काही रक्कम जमा केल्याने त्यांचा विद्युत पुरवठा सुरू आहे. मात्र अडीच महिन्यांपासून खोंडामळी ग्रामपंचायतीने विज बिल न भू भरल्याने वरिष्ठांच्या आदेशाने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.चालू विद्युत बिल च्या रकमेपैकी वीज बिलाची रक्कम जमा केल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.
जागृती साळुंके, सहाय्यक अभियंता, खोंडामळी सबस्टेशन.








