नंदुरबार l प्रतिनिधी-
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत दिलीपराव मोरे यांनी गोर गरिबांची दिवाळी गोड केलेली आहे. शहरातील कंजरवाडा परिसरातील रायलाल नगरातील गरजूंना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शेकडोंवर महिलांनी लाभ घेतला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रमुख डॉ. विक्रांत मोरे म्हणाले, सध्या दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडलेली आहे. पेट्रोल १५० रुपये तर डिझेल १०० रुपयांवर जाईल. प्रत्येक वस्तू महागाईच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. गोर गरिबांची दिवाळी गोड व्हावी त्यामुळे मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याप्रसंगी नगरसेवक मनोज चव्हाण, माजी नगरसेवक अर्जुन मराठे, शहर उपप्रमुख लखन माळी, आनंद पाटील,युवती सेनेच्या काजल मच्छले, ज्ञानेश्वर गुमाने,राजेश मच्छले, प्रकाश मच्छले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेली आहे. सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले आहे. शासकीय निमशासकीय कर्मचार्यांना बोनस देण्यात मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे.ठीकठिकाणी दिवाळीच्या फराळाची लगबग दिसून येत आहे. गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे यांनी आज शुक्रवार (दि. 29) रोजी शहरातील कंजरवाडा भागातील रायलाल नगरात मोफत साखरचे वितरण करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडोंवर महिलांनी मोफत साखरेचा लाभ घेतला. दिवाळीच्या गोडवा पसरल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.








